यंदाचा हंगाम ‘कुकडी’ पूर्ण ताकदीने पूर्ण करणार – राहुल जगताप

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- अडचणी आणि संघर्षातून कुंडलिकराव जगताप यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली. कुकडी पट्ट्यातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना देण्यासाठी त्यांनी कसलीही पर्वा केली नाही.

त्यामुळे यंदाचा हंगाम ताकदीनिशी करू, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल जगताप यांनी गुरुवारी व्यक्त केला.

कर्मयोगी कुंडलीकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याचे मशिनरीचे गुरुवारी कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप, विलासराव दिवटे व संचालक मंडळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब उगले, विश्वास थोरात, विवेक पवार, अंकुशराव रोडे, प्रल्हाद इथापे, कचरुमामा मोरे, दत्तात्रय मरकड, कल्याणपाटील जगताप, प्रोडक्शन मॅनेजर अनिल कुमार, मुख्य अभियंता भास्करराव काकडे आदी उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment