नेत्यांचे तालुके लॉकडाऊन अहमदनगर शहर मात्र वाऱ्यावर !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राज्यात कोरोनावाढीचे विक्रमी आकडे सुरु असतानाच नगर जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन करायचे कि नाही हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येऊ लागला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राहुरी तालुक्यात सात दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तहसीलदार शेख फसिओद्दीन यांनी ही माहिती दिली.

कर्जत-जामखेड पाठोपाठ राहुरी तालुकाही लॉकडाऊन झाल्यामुळे हेच नगरला का होऊ शकत नाही, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

कर्जत जामखेड लॉक : संपूर्ण जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.अशीच स्थिती काही दिवसांपूर्वी कर्जत-जामखेड येथे होती. तेथे आ. रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन काही दिवस हे दोन्ही तालुके लॉकडाऊन करण्यास प्रशासनास भाग पाडले.

राहुरी तालुका लॉक :- राहुरी तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. या तालुक्याच्या तुलनेत नगरमध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र राहुरीचे नेतृत्त्व करणारे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेत तालुका लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. 10 ते 17 सप्टेंबर या कालावधीत तालुका लॉकडाऊन राहणार आहे.

पालकमंत्र्यांचा तालुकाही लॉक :- पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ यांचा कागल तालुका आणि परिसर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बंद करण्यात आला आहे. नगरमध्ये येऊन बंद करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे सांगणारे पालकमंत्री मात्र त्यांचा तालुका बंद करत आहेत.

नगर लॉकडाऊन होणार का? नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना लॉकडाऊन करत कोरोनाची साखळी तोडता येणे शक्य आहे, मात्र नगरचे नेतृत्त्व आणि प्रशासन मात्र याबाबत उदासीन का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment