नगर तालुक्यातील हे गाव सात दिवस राहणार बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी निंबळक ग्रामस्थांनी गाव सात दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय  घेतला आहे . सोमवार संध्यापासून यांची अंमलबजावणी होणार आहे .

याबाबत प्रशासनाला कळविले असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे यांनी दिली. निंबळक( ता. नगर ) येथे कोरोना बाधीत रुग्णाची संख्या दिवसो दिवस वाढत चालली आहे.

नुकतेच दोघाचा कोरोनामुळे मुत्य झाला आहे. एमआयडीसी जवळ असल्याने दररोज कामगारांचा अनेक नागरिकाबरोबर संपर्क वाढत आहे. नागरिक विनाकारण गर्दो करत आहे.

मास्क न बांधता फिरत आहे. परीणामी कोरोनाचे प्रमाण वाढत चालले आहे . खबरदारीचा पर्याय म्हणून सोमवार संध्याकाळ पासून सात दिवस कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

यामध्ये फक्त दवाखाना, मेडीकल व सकाळी व संध्याकाळी एक तास दुध डेअरी उघडी असणार आहे. बाकी सर्व दुकाने बंद असणार आहे .एमआयडीसी मध्ये जाणाऱ्या कामगारांनी सात दिवस  कामावर जाऊ नये .

बाहेर गावातून येणाऱ्या फेऱ्या वाल्याना बंदी घालण्यात आली आहे .नियमाचे उल्लघन करणाऱ्यना एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.  असे ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यावेळी शरद लामखेडे ,घनशाम म्हस्के  , पंचायत समिती सदस्य डॉ. दिलीप पवार , आरोग्य अधिकारी डॉ. निलेश कोल्हे , बी.डी. कोतकर , राजेंद्र कोतकर , ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे , प्राजक्ता साळवे ,दत्ता धावडे,नितिन पाडळे उपस्थित होते .

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment