रस्त्याची झाली चाळण; रोहित दादा जरा इकडेही लक्ष द्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :-   कोरोनाच्या संकटमय काळात समस्यांचे राजकीय भांडवल करणाऱ्या विरोधकांना आपल्या शैलीत उत्तर देणारे आमदार रोहित पवार हे चांगलेच चर्चेत असतात.

मात्र आता त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या नगर-सोलापूर रस्त्याची चाळण झाली आहे. याकडे जरा लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करू लागले आहे. देशाच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. त्यामुळे त्यावर मोठ्या प्रमाणावर वदर्ळ असते.

मात्र आता याच नगर-सोलापूर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कोरोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही याचा फटका बसतो. या भागातून नगर शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे रुग्णांनाही याच महामार्गाने आणावे लागते.

80 किलोमीटरच्या प्रवासासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागत असल्याने गंभीर कोरोना बाधित रुग्णांना तातडीची मदत मिळण्यातही अडचणी येत आहेत. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना होतोय त्रास आ. रोहित पवार यांच्यासोबतच श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते,

नगरचे आमदार संग्राम जगताप आणि या भागाचे खासदार डॉ. सुजय विखे यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. मुख्य म्हणजे दिल्लीपासून बंगळुरूपर्यंतची वाहतूक या महामार्गावरून होते. चौपदरीकरण होईल तेव्हा होइल, दुरूस्ती करून तात्पुरता दिलासा देण्याकडेही लक्ष दिले जात नाही,

ही नागरिकांची खंत आहे. पवार यांनी या मतदासंघात विजय मिळविल्यानंतर अनेक कामे हाती घेतली असली तरी या महामार्गाच्या दुरूस्तीच्या कामात त्यांनी लक्ष घातले नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. आतापर्यंत होऊन गेलेल्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये फारसे लक्ष घातले नाही. आता पवार यांच्याकडून मतदारांना अपेक्षा आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment