अहमदनगर ब्रेकिंग : प्रेम प्रकरणातून तरुणीवर गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून तरुणाने केले असे काही….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,15 सप्टेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे प्रेम प्रकरणातून एका तरुणाने येथील तरुणीच्या घरात जावून गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडून तिला मारण्याचा प्रयत्न केला, 

त्त्यानंतर तरुणाने स्वतःला गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणी बचावली. मात्र आरोपी तरुण विक्रम मुसमाडे हा गंभीर जखमी झाला आहे.

त्याला लोणी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून या तरुणीचे जबाब घेण्याचे काम सुरू आहे. राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख व श्रीरामपुरचे विभागीय पोलीस आधिकारी राहुल मदने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

दरम्यान सदर तरुण विक्रम मुसमाडे सोबत असलेला एकजण तेथून पसार झाला आहे. ही घटना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवळालीप्रवरा येथे भंडारी काॕलनीजवळ घडली. या घटनेमुळे देवळाली प्रवरा शहर हादरून गेले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment