सभापती म्हणाले नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 सप्टेंबर 2020 :- महापालिका स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर यांनी पक्षीय बंधने झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे. सभापती पद स्वीकारल्यावर ते नेमके कोणत्या पक्षाचे हे सांगण्याचे त्यांनी टाळले.

सभापती पदाच्या माध्यमातून नगर शहर खड्डेमुक्त करण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. स्थायी समितीवर भाजप कोट्यातून सदस्य म्हणून आलेल्या कोतकर यांनी राष्ट्रवादीचा पंचा गळ्यात घालून

त्यांच्याकडून सभापतिपद निवडणूक लढवली. त्यानंतर शिवसेनेचे योगीराज गाडे यांना महाविकास आघाडी धर्म पाळण्यास सांगून माघार घेण्यास लावल्यावर कोतकर बिनविरोध सभापती झाले.

ते राष्ट्रवादीचे असल्याचा दावा आ.संग्राम जगताप यांनी केल्यावर भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनीही ते भाजपचे असल्याचा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर सभापतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर बोलताना,

ते राष्ट्रवादीचे की भाजपचे आहेत, हे सांगण्यास त्यांनी प्रत्यक्ष नकार दिला नाही, पण या प्रश्नाकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करत बोलण्याचे टाळले. पदाच्या माध्यमातून शहराचा विकास करण्यास प्राधान्य असल्याचे सांगितले.

त्यांच्या पदग्रहण समारंभास राष्ट्रवादी विरोधी पक्ष नेते संपत बरस्कर, कुमार वाकळे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते. दरम्यान, महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक राहुल कांबळे, मनोज दुलम, गणेश ननावरे, अजय चितळे यांनीही त्यांचा सत्कार केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment