रोहित पवारांच्या बर्थडेला सामाजिक उपक्रमांचा केक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-  अनेक नेतेमंडळी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त चौकाचे शोभीकरण धोक्यात आणत कार्यकर्त्यांसह आपले मोठं मोठे बॅनर झळकवतात. लाखोंची उधळपट्टी करत स्वतःची हौस करून घेतात.

मात्र अगदी याउलट तरुणाईचे लाडके आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाची कार्यक्रम पत्रिका सामाजिक कामांनी भरलेली होती. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांचा नुकताच वाढदिवस झाला आहे.

पवार यांचा वाढदिवस वेगवेगळ्या सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोव्हिड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड, ऑक्सी मीटर, पीपीई किट भेट देण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्याबरोबर मास्क भेट देण्याबरोबरच जास्त ऑक्सिजन देणारे झाड देत आठवण म्हणून शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.

राष्ट्रवादी नेते श्याम कानगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती अश्विनी कानगुडे यांच्या माध्यमातून पन्नास टक्के सवलतीत आटा चक्की वाटप करण्यात आले.

सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब थोरात यांनी कोव्हिड सेंटरला दोन लाखांची रोख मदत दिली. पुणे येथील नगरसेविका प्रिया शिवाजी गदादे यांच्या वतीने मोफत दीड हजार वृक्षांची रोपे वाटण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनमाळी व नगरसेविका मनिषा सोनमाळी यांच्या माध्यमातून पन्नास टक्के सवलतीत कडबा कुट्टी वाटप करण्यात आले.

इतर नेत्यांचे वाढदिवस म्हणजे मोठं मोठे फ्लेक्स, जाहिरातबाजी, फटाके, कार्यकर्त्यांची चमकोगिरी या सगळ्यांना फाटा देत वेगळेपण जपत वाढदिवस साजरा करण्यात आला.

माझ्या वाढदिवस सामाजिक आणि विधायक उपक्रमांनी साजरा करा. कोव्हिड सेंटरला मदत करा तसेच कोरोना योध्यांना सन्मानित करा.

एखादया गरजू मात्र गुणवंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरा, अशा अनेक समाजउपोयोगी उपक्रम राबवा, असे आवाहन रोहित पवार यांनी केले होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment