कोरोना महामारीमुळे ‘या’ देवीच्या मंदिरातील नवरात्र उत्सव रद्द

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे यंदाच्या वर्षी सर्वच सणउत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. नुकताच होऊन गेलेला गणेश उत्सव देखील अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता.

याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला आहे.

त्यामुळे भाविकांनी मंदिर कार्यस्थळावर घटी बसण्यासाठी येऊ नये. प्रसाद साहित्य, खेळ साहित्य, खाद्यपदार्थ विक्रेते इत्यादी वस्तू विक्रेत्यांनी मंदिर यात्रा उत्सवासाठी येऊ नये,

सर्व भाविकांनी घरच्या घरी नवरात्र उत्सव काळात आपल्या घरीच शासन नियम पाळून नवरात्र उत्सव साजरा करावा, असे आवाहन रेणुकादेवी देवस्थान व उक्कडगाव ग्रामस्थांनी केले आहे.

पोलीस प्रशासन, व तहसीलदार यांनी या काळात संपूर्णपणे बंदोबस्त ठेवून रेणुका देवी मंदिराच्या चारही बाजूंनी प्रवेशद्वारे बंद करावीत. भाविकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी नवरात्र उत्सव काळात निर्बंध घातले आहेत,

प्रसाद साहित्य विक्री, व्यावसायिकांनी उक्कडगाव मंदिर कार्यस्थळावर विनाकारण गर्दी करू नये, अन्यथा विनापरवाना जमाव करणार्‍याविरुद्ध कारवाई केली जाईल. असा इशारा देण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment