“गौरी सजावट” स्पर्धेतील विजेत्या महिलांना पैठणी भेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- स्नेहबंध फौंडेशन, अहमदनगर पोलीस दल व इनरव्हील क्लब यांच्या वतीने आयोजित भिंगार शहरातील उत्कृष्ट गौरी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पैठणीच्या मानकरी संस्कृती पेंडुरकर या ठरल्या.

सविता हिकरे, इंदिरा फल्ले यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे व इनरव्हीलच्या अध्यक्षा वंदना भंडारी यांचे संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

विजेत्यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते पैठणी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत एकूण १८ सहभागी आरासींचे परीक्षण करण्यात आले.

यावेळी भंडारी सप्लायर्सचे रुपेश भंडारी, रेश्मा चारानिया,शहाजमीन चारानिया, हेमंत ढाकेफळकर,सचिन पेंडुरकर आदी उपस्थित होते.

स्नेहबंध फौंडेशनने या उपक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या माध्यमातून चांगले आणि दर्जेदार उपक्रम भविष्यकाळातही आयोजित करण्यात येणार आहेत, असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी यावेळी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment