शिर्डी पोलीस उप विभागीय अधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- शिर्डी येथील पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांची बदली झाली होती, त्यांच्या जागेवर कर्जत येथून संजय सातव यांची नियुक्ती झाली आहे.

नुकताच सातव यांनी पदभार स्वीकारून शिर्डी मध्ये काम करायला सुरुवात केली आहे, दरम्यान सोमनाथ वाकचौरे हे प्रतीक्षाधिन अधिकारी होते,

मात्र आज बुधवार 14 ऑक्टोबर रोजी त्यांना पोलीस महासंचालक यांच्या आदेशाने त्यांची बदली भुसावळ जिल्हा जळगाव येथे पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

सोमनाथ वाघचौरे हे आता भुसावळ येथे पोलिस उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत राहणार आहे. महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी राज्यातील पोलीस उपअधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या काही बदल्या केल्या आहेत,

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment