आमदार रोहित पवार म्हणाले चौकशीत सत्य बाहेर येईलच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार योजनेवर साडेनऊ हजार कोटी खर्च झाले आहेत. ‘कॅग’च्या अहवालानुसार तो पैसा जनतेच्या हितासाठी व पाण्यासाठी खर्च झाला असता, तर तो वाचला असता.

महाविकास आघाडी सरकारने कोणताही राजकीय हेतू न पाहता वाया गेलेल्या पैशांबाबत एसआयटी स्थापन केली आहे. चौकशीत सत्य बाहेर येईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

जलसंधारणावर झालेल्या खर्चात भ्रष्टाचार झाला नाही, असे माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचे म्हणणे आहे. फक्त खर्चाच्या चौकशीसाठी एसआयटी सरकारने नियुक्त केली आहे भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नाही, असे त्यांनी सांगितले.

याबाबत आमदार पवार यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारली असता ते म्हणाले, मागील सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेत जवळपास साडेनऊ हजार कोटी खर्च झाले.

याला कॅगने आक्षेप घेतला आहे. एवढी मोठी रक्कम खर्च होऊनही त्याचा उपयोग झाला नाही. हाच पैसा जनतेच्या हितासाठी व पाण्यासाठी खर्च झाला असता, तर तो वाचला असता असे कॅगने म्हटले आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने वाया गेलेल्या पैशांसाठी एसआयटीची नियुक्ती केली आहे. यातून योग्य अहवाल समोर येईल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment