अवकाळी पावसाच्या नुकसानीची तात्काळ मदत द्या – आमदार बबनराव पाचपुते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज या नुकसानीचे पेडगाव भागात आमदार बबनराव पाचपुते यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली.

व या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार पाचपुते यांनी दिले.आज सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थिती बैठक झाली या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके ,नगरसेवक बापूसाहेब गोरे ,संतोष खेतमाळीस,संतोष क्षीरसागर ,शहाजी खेतमाळीस ,भाजप चे प्रसिद्धी प्रमुख अमर छत्तीसे,भाजप तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र उकांडे उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात श्रीगोंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस झाला या वादळी अवकाळी पावसात ऊस ,कपाशी ,मका ,तूर ,कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कपाशी पिकाचे तर अतोनात नुकसान झाले असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी पेडगाव भागात पाहणी दौरा केला या दौऱ्यात तहसीलदार प्रदीप पवार ,गटविकास अधिकारी प्रशांत काळे,तालुका कृषी अधिकारी पदमनाथ म्हस्के ,संदीप बोदगे ,पेडगाव येथील गणेश पवार ,युवा नेते गणेश झिटे ,माजी सरपंच दिलीप कराळे,बशीर काजी ,सागर जाकडे ,नारायण कणसे ,महेश खेडकर ,विजय कराळे , अहमद पिरजादे ,सीताराम मांडगे नांदगुडे चेअरमन आदी उपस्थित होते.

सरकारने तात्काळ मदत द्यावी -आ पाचपुते

अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फळबागा ,ऊस ,कपाशी ,कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पण अद्यापही सरकार कडून कोणत्याही प्रकारची मदतीची घोषणा झालेली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना देखील सरकार नुकसानीबाबत गांभीर्याने घेत नाही, पंचनाम्याचा फार्स करण्यापेक्षा तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment