भाजप नेत्याचे रोहित पवारांवर टीकास्त्र… ते अज्ञानी असून त्यांनी माहिती घेऊन बोलावे’

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- सध्या आपल्या कार्यतत्परतेमुळे नावारूपाला असलेले कर्जत – जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप नेत्याने घणाघात टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे अज्ञानी आहेत, त्यांनी माहिती घेऊन बोलावे असं प्रतिपादन भाजपचे माजी मंत्री आणि प्रदेश अध्यक्ष किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल बोंडे यांनी केले आहे.

तसेच या विषयाबाबत पुढे बोलताना बोंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये फोन वरून चर्चा झालीय. पंतप्रधानांनी मदतीचं आश्वासनही दिलं आहे.

दरम्यान शेतकऱ्यांना मदतीसाठी केंद्राने मदत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली होती. त्यावरून भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.

नेमके काय म्हणाले होते आमदार रोहित पवार जाणून घेऊ दुःख वाटून घेण्याची आपली संस्कृती आहे. आज बळीराजावर दुःखाचा डोंगर आहे. तो दूर करायचा असेल तर प्रत्येकाला जबाबदारी घ्यावीच लागेल.

राज्य सरकार ती घेत आहे. पण केंद्रानेही GST चे राज्याचे थकीत 28 हजार कोटी अन्नदात्याला आणि असंघटित क्षेत्राला सावरण्यासाठी तातडीने द्यावेत अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती.

यावर सडेतोड ऊत्तर देताना भाजपचे माजी मंत्री बंडे म्हणाले की, जीएसटीचे पैसेही केंद्र सरकार देत आहे. राज्य सरकारने आपली जबाबदारी टाळून केंद्राकडे बोट दाखवू नये.

फडणवीस सरकार असताना या आधी उद्धव ठाकरे यांनी जी मागणी शेतकऱ्यांसाठी केली होती तीच मागणी त्यांनी पूर्ण करावी असंही ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment