त्या मुद्रांक विक्रेतावर कारवाई करा…या अन्यथा शिवसेनेशी गाठ आहे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-  कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात अनेक अधिकृत शासनमान्य मुद्रांक विक्रेत्यांकडून ‘मुद्रांक व न्यायालयीन तिकीट’ यासाठी ठराविक रकमेपेक्षा जास्त पैसे आकारात असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

ता वाढीव शुल्क आकारणीमुळे नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. यासंदर्भात कोपरगाव तहसिल कार्यालयात जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त रक्कम घेणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यावर कारवाई करण्यात यावी,

असे निवेदन शिवसेना ग्राहक मंचाच्या वतिने तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाची फसवणूक करणार्‍या मुद्रांक विक्रेते व पाठिशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करून

दोषींचे परवाने रद्द करण्याबाबत तात्काळ ठोस पावले उचलावीत. अन्यथा गाठ शिवसेनेशी असल्याचा इशारा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर यांनी दिला आहे.

यावेळी राजेंद्र झावरे म्हणाले की,या प्रकणाला आळा घालावा व ग्राहकांची फसवणूक थांबवावी.यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झावरे,ग्राहक संरक्षण मंचाचे मुंकुद सिनगर,

शिवसेना शहर अध्यक्ष कलविंदर भरत मोरे डडियाल,ग्राहक संरक्षण मंचचे रवींद्र कथले,विंक्रात झावरे,राहुल देशपांडे, अशोक पवार,गगन हाडा,सतिष पवार, रोहित पवार, इरफान शेख उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment