‘ह्या’ मंत्र्यांचा भाऊ थेट कोरोना रुग्णाच्या भेटीला; नंतर म्हणाले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- सध्या कोरोनाचे रुग्ण सर्वत्र आढळत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले. परंतु कोरोना झालेल्या रुग्णाकडे मात्र वेगळ्याच नजरेने पहिले जाते.

त्याच्याकडे वेगळीच दुरी ठेऊन वर्तवणूक केली जाते. परंतु याला छेद देत कोरोना सारख्या आजारासोबत झुंज देत असणाऱ्या आपल्या कार्यकर्त्याला मानसिक आधार देण्यासाठी मंत्री शंकरराव गडाख यांचे भाऊ प्रशांत गडाख थेट एका खासगी रुग्णालयात पोहोचले.

त्याठिकाणी त्यांनी त्या रुग्णाची भेट घेत त्याच्यासोबत संवादही साधला. याबाबत प्रशांत गडाख यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, ‘कोरोना हा सर्वांसाठी नवीन आजार आहे. या आजाराच्या मुळापर्यंत कोणी गेले नाही. मी आतापर्यंत अनेक रुग्णांना भेटलो असून त्यामधून माझी भिती दूर झाली आहे.

मला यामधून संदेश एवढाच द्यायचा आहे की, करोना रुग्णाला मानसिक आधार देणे हे खुप गरजेचे असते. कारण मानसिक आधारातून खुप ऊर्जा संबंधित रुग्णाला मिळत असते. सायन्स सोबत मानसिक आधार गरजेचा आहे असे ते म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment