अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या ‘ ग्रामीण रुग्णालयास देशात ‘हा ‘ बहुमान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :-  सध्या देशभरमध्ये रुग्णालयांची गरज आणि भूमिका काय असते ते कोरोंनाच्या काळामध्ये सर्व देशाने अनुभवले आहे. या कार्यकाळामध्ये अनेक रुग्णालयांनी भारतास सावरण्याचे कार्य केले.

आता अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाने आणखी एक मानाचा तुरा खोऊन घेतला आहे. या रुग्णालयास मुल्यांकनात देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

सलग तिसर्‍यांदा राज्यात व देशात प्रथम येणारे ग्रामीण रुग्णालय एकमेव ठरले आहे. या रुग्णालयाने 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील व राज्यात सर्व आरोग्य संस्थामध्ये कायाकल्प योजना राबविली जाते. सामान्य गरजु, गरुब रुग्ण व नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करुन देशाचे आरोग्य संस्था,

स्वच्छ, सुंदर, पारदर्शक गुणवत्तावर्धक व संक्रमणरहित रुग्णसेवा समितीमार्फत मुल्यांकन करण्यात येते. यात जिल्हा रुग्णालय स्तर, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय स्तर, स्त्री रुग्णालय स्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र याचा समावेश आहे.

सदरचा पुरस्कार जनता, लोकप्रतिनिधी, रुग्णालयात अधिकारी व रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या सातत्यपूर्वक परिश्रम व मानसिक परिवर्तन यामुळेच मिळाला आहे.

हा पुरस्कार सर्वसामान्य जनतेस समर्पित करण्यात येत आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. वसंत के. जमधडे यांनी सांगितले.

मूल्यांकन कशाचे झाले ? :- श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयास राज्यात प्रथम क्रमांक येण्यासाठी त्यांनी हॉस्पिटल अपकिप, सॅनिटेशन अ‍ॅड हायजीन, वेस्ट मॅनेजमेंट, इन्फेक्शन कंट्रोल, हायजीन प्रमोशन,

सपोर्ट सर्व्हिसस, बियाँड हॉस्पिटल हे सर्व निकषावर स्पर्धेचे पुरक्षण करुन मुल्यांकन देण्यात आले आहे. या निकषात मुल्यांकनास देश व राज्य पातळीवर पात्र ठरले असून त्यामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment