सतरा वर्षांच्या प्रेयसीची कोयत्याने हत्या करणाऱ्यास आजन्म कारावास

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- सतरा वर्षांच्या प्रेयसीची कोयत्याने हत्या करणाऱ्यास दोषी ठरवत प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अाणेकर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रदीप माणिक कणसे (२४, तळणी, ता. रेणापूर, जि. लातूर) असे आरोपीचे नाव आहे.

प्रदीपचे लातूरमधील निलंगा येथील मुलीवर एकतफी प्रेम होते. आपल्याशी लग्न करावे, यासाठी तो तिला वारंवार त्रास देत असे.ती नगरला मावस काकाकडे आली असता प्रदीपने २७ मे २०१६ रोजी नगरमध्ये येऊन बुरूडगाव रोड परिसरातील घराच्या छतावर तिची कोयत्याने हत्या केली. या खटल्यात सरकारी अभियोक्ता सतीश पाटील यांनी काम पाहिले.

घटनेच्या एक दिवस आधी प्रदीप मित्रांबरोबर नगरला आला. चेतना लॉजमध्ये मुक्काम करून त्याने ऊसतोडणीचा काेयता विकत घेतला. २७ मे २०१६ रोजी तो संबंधित मुलगी राहत असलेल्या घराच्या छतावर गेला. मुलीने लग्नास नकार दिल्याने त्याने कोयत्याने तिची हत्या केली. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्कालिन सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण व त्यानंतर पोलिस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र सादर केले. सरकारी पक्षाच्या वतीने १९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी काही महत्त्वाचे साक्षीदार फितूर झाले. सरकारी अभियोक्ता सतीश पाटील यांनी उलट तपासणी केली.

लॉजचे मालक, कोयता विक्रेता, घरमालक, कोयत्याला धार लावणारा यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दरम्यान, आरोपी व संबंधित मुलीचे लग्न झाले होते. मुलीच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. त्यामुळे तिला सांगून आरोपीला नगरला बोलावून फिर्यादीनेच हस्तका मार्फत मुलीची हत्या केल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

मात्र, पाटील यांनी हा युक्तिवाद खाेडून काढत आरोपीनेच मुलीचा खून केला असल्याचा युक्तिवाद केला. न्यायाधीश आणेकर यांनी पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment