चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नका : आमदार राजळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर असून आतापर्यंत तीन दुर्दैवी घटना घडून बळी गेले. सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

चौथा बळी जाऊ नये यासाठी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत असून जिल्हा उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी तालुक्यात आठ दिवसांपासून तळ ठोकून आहेत.

नागरिकांनी स्वतःसह कुटुंबीयाची काळजी घ्यावी, तसेच बिबट्याबाबत प्रशासनास योग्य माहिती देऊन सहकार्य करावे. सोशल मीडियावर जुनी किंवा चुकीची माहिती टाकून संभ्रम निर्माण करून वनविभागासह प्रशासनाची दिशाभूल करू नये,

असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले. तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी,

पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे, अभियंता हरिश्चंद्र पोपळघट, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, सभापती गोकूळ दौंड, उपसभापती रवींद्र वायकर, जि. प. सदस्य राहुल राजळे, पुरुषोत्तम आठरे आदी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment