जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून, नवीन २६६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १६५ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले १३, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ४, संगमनेर १, श्रीगोंदे २, मिलिटरी हॉस्पिटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत मनपा १६, अकोले ३, कर्जत २, नगर ग्रामीण ८, नेवासे १, पारनेर १, राहाता २, राहुरी ५, संगमनेर ९, शेवगाव १, श्रीरामपूर ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत १६५ जण बाधित आढळून आले. यात मनपा १९, अकोले १३, जामखेड ७, कर्जत ११, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २, नेवासे २०, पारनेर ४, पाथर्डी २०, राहाता ८, राहुरी ४, संगमनेर २४, शेवगाव १५, श्रीगोंदे ११, श्रीरामपूर ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, दिवसभरात दोन जणांचा मृत्यू झाला असून, बळींची संख्या आता ८८५ झाली आहे, तर आतापर्यंत ५७६३३ रुग्ण आढळून आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment