अहमदनगर महाविद्यालयात एन.एस.एस व रेड रिबन क्लब आयोजित एड्स जनजागृती सप्ताह संपन्न

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-एड्स विषयी विविध स्तरावरील जनजागृती कार्यक्रमामुळे युवा पिढीला सहज माहिती मिळते आहे, त्यामुळे देशात निरोगी युवा पिढी तयार होत आहे.

एक सजग, सतर्क व विवेकशील युवा निर्माण करण्यासाठी एनएसएस मधील अशा अनेक कार्यक्रमाचे योगदान महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर यांनी केले.

अहमदनगर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस) व रेड रिबन क्लब द्वारा आयोजित एड्स जनजागृती सप्ताह अंतर्गत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी डॉ.बाळासाहेब गायकर बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.रज्जाक सय्यद, रजिस्टार ए.वाय.बळीद, समन्वयक केशव कापसे, हिंदी विभागप्रमुख ऋचा शर्मा, कार्यक्रम अधिकारी डॉ.मालती येवला, प्रा.अशोक घोरपडे आदि उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या एड्स जनजागृती समितीचे अहमदनगरचे समन्वयक मा. केशव कापसे यांनी स्वयंसेवकांना एड्स विषयी सविस्तर माहिती दिली व चर्चा केली.

तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे ही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी प्रा.अशोक घोरपडे यांनी केले. तर आभार स्वयंसेवक निलेश फसले याने केले. स्वयंसेवक ऋतुजा पिटेकर, वैष्णवी पाडे, श्रेयस कांबळे,आकाश देशमाने यांनी सहकार्य केले.

Leave a Comment