शिवसेना इतरांच्या घरी जन्मलेल्या बाळांसाठी पेढे वाटते- विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- राज्यात तीन पक्षांची आघाडी असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपला मोठी संधी आहे. तीन पक्षातील सरकारमध्ये शिवसेना इतरांच्या घरी जन्मलेल्या बाळांसाठी पेढे वाटत असल्याचे टीकास्त्र विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

ते शनिवारी नागपुरात प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. राज्यात नुकत्याच विधानपरिषद पदवीधर निवडणुका आटोपल्या आहेत. त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागले आहे,

ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीकडे. यात मर्यादित जागा असल्यामुळे आणि तीन पक्षांच्या कारभारामुळे भाजपाला ही निवडणूक सोपी जाणार, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

शिवसेनेबद्दल बोलतांना ते म्हणाले, की शिवसेनेला मागील निवडणुकीत काही मिळाले नाही, तरी ते आनंद साजरे करत फिरत आहेत. हे म्हणजे इतरांच्या घरात जन्मलेल्या मुलासाठी स्वतः पेढे वाटण्यासारखे झाले, अशी टीका त्यांनी केली.

तसेच देशात कितीही पक्ष एकत्रित आले, तरी भाजपाला काही फरक पडणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. शरद पवार यांच्या वाढदिवसावर बोलताना फडणवीस म्हणाले, की पवार साहेब महाराष्ट्राची सामाजिक, आर्थिक, राजकीय जडण-घडण समजणारे आहेत.

आमचे राजकीय विचार जरी वेगळे असले तरी पवार साहेबांची प्रतिमा ही राजकारणात वेगळी आहे, असे म्हणत फडणवीस यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment