म्हातारपणी आधार देणाऱ्या मोदी सरकारच्या ‘ह्या’ योजना तुम्हाला माहित आहेत का ? वाचा अन फायदा घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- प्रत्येक व्यक्तीला त्याच्या भविष्याविषयी चिंता असते. त्यानुसार तो व्यक्ती आपल्या जीवनात आर्थिक तरतूद करून ठेवत असतो.

सरकारी नोकरदार किंवा ज्यांना जास्त पगार आहेत असे लोक तरतूद करू शकतात. पण कमी पगार असणारे किंवा असंघटित काम करणारे आदी लोकांना मात्र हे जमावाने अवघड असते.

यासाठी मोदीस सरकारने म्हातारपणी आधार देणाऱ्या काही योजना सुरु केल्या आहेत. जाणून घेऊयात त्याविषयी सविस्तर…

अटल पेन्शन योजना :- मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असणारी अटल पेन्शन योजना, या योजनेमध्ये दररोज 7 रुपये बचत करून 60 वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपये अर्थात वार्षिक 60 हजरांची पेन्शन मिळवू शकता.

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना प्रतिमहिना 1 ते 5 हजार रुपयांपर्यंत पेन्शन देत आहे.

18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती अटल पेन्शन योजना खाते उघडू शकते. या सरकारी योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक केली जाईल तितका निधी जमा होतो.

PM शेतकरी मानधन योजना :- या योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करणाऱ्या शेतकऱ्यांना वयाच्या 60 व्या वर्षापासून कमीतकमी 3000 रुपये पेन्शन दिलं जातं.

पीएम शेतकरी मानधन योजनेमध्ये जितका प्रीमियम शेतकरी भरतात तेवढाच सरकारकडून देखील शेतकऱ्याच्या या योजनेतील खात्यात जमा केला जातो.

या योजनेमध्ये जर एखादा शेतकरी वयाच्या 18 व्या वर्षापासून जोडला गेला तर त्याला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील.

वयाच्या 30 आणि 40 व्या वर्षी शेतकऱ्याने पैसे गुंतवण्यास सुरुवात केली तर त्याला अनुक्रमे 110 आणि 200 रुपये भरावे लागतील. ज्या शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त 2 हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

PM श्रमयोगी मानधन योजना :- असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे. ड्रायव्हर्स, प्लंबर, मोची, टेलर, रिक्षाचालक, धोबी आणि शेतमजूर आदी या योजनेचा फायदा घेऊ शकतात.

त्याअंतर्गत अशा लोकांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यावर दरमहा किमान 3 हजार रुपये पेन्शन मिळेल. तसेच, जर पेन्शन घेताना लाभार्थीचा मृत्यू झाला तर त्याच्या पेंशनपैकी 50 टक्के रक्कम पती / पत्नीला पेंशन म्हणून दिली जाईल.

वयानुसार यात पैसे जमा करावे लागतील. जितके वयाने लहान सदस्य असेल तितके त्याचे योगदान कमी होईल. वयाच्या 18 व्या वर्षी जर कोणी या योजनेत सामील होईल तर त्यांना दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील.

त्याचप्रमाणे वयाच्या 29 व्या वर्षी कुणी हे सुरु केले तर 100 रुपये आणि 40 वर्षांचे 200 रुपये द्यावे लागतील. ही रक्कम वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत जमा करावी लागेल.

Leave a Comment