मुख्याध्यापकाला झालेल्या मारहाणीचा जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून निषेध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान नगर तालुक्यातील डोंगरणग येथील मतदान केंद्रावर मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत भुतकर यांना झालेल्या मारहाणीचा अहमदनगर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्यापक संघाच्यावतीने निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित व पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार दि.15 जानेवारी 2021 रोजी डांगरगण, ता.नगर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये डोंगरगण येथील मते पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत काशिनाथ भुतकर हे आपल्या वयोवृद्ध अर्धांगवायू असलेल्या

मातोश्रींना मतदानासाठी स्वत:च्या कारमध्ये घेऊन जात असतांना एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक मोहन बोरसे यांनी त्यांना कुठलीही चौकशी न करता अमानुषपणे बेदम मारहाण केली. श्री. भुतकर यांनी ड्युटीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबल यांची पूर्व परवानगी घेऊन मतदान केंद्रात प्रवेश केला होता.

ही सर्व घटना पाहता पो.नि.मोहन बोरसे यांनी केलेले कृत्य हे निश्तिपणे निषेधार्थ असून, या कृत्याचा अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने निषेध करण्यात येत असून, पोलिस निरिक्षक मोहन बोरसे यांची सखोल चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे निवेदात म्हटले आहे.

या निवेदनावर संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, भा.अं.रोहकले, भा.दं.सांगळे, चंद्रकांत चौगुले, के.एल.हापसे, दिपक रामदिन, सुनिल गाडगे, सखाराम गारुडकर, दत्तात्रय गुंड, सौ.आशा मगर, डी.एम.रोकडे, व्ही.एल. गरड, यशवंत भुतकर, बापूसाहेब जगताप, पी.एस.भुतकर, एन.के.कदम, जालिंदर शेळके, एस.के. केदार, महेंद्र हिंगे, बाबासाहेब बोडखे आदिंच्या सह्या आहेत.

Leave a Comment