महत्वाची बातमी : राज्यात थंडी परतण्याची शक्यता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- महाराष्ट्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्याच्या काही भागात अंशत: ढगाळ हवामान आहे. मात्र, ते दूर होणार आहे.

दरम्यान, पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्यामुळे राज्यात थंडी परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदियामध्ये ६.८ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली आहे.

सध्या उत्तरेकडील बहुतांश राज्यांत थंडीची तीव्र लाट आली आहे. मात्र, महाराष्ट्रात अद्यापि कडाक्याची थंडी नाही. कमी दाबाचे पट्टे आणि समुद्रातील बाष्पामुळे राज्यात थंडी गायब झाली आहे.

मात्र, आता हवामानात बदल होत आहे. ढगांचे सावट दूर होणार आहे. सध्या दिल्ली, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशामध्ये थंडीची लाट आहे. याभागातून राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहे.

मात्र, उत्तर महाराष्ट्रात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थंड वाऱ्यांच्या प्रभाव जाणवत नाही. राज्याच्या काही भागात किमान तापमानात घट झाली आहे, तर काही भागात पारा वर गेला आहे.

मराठवाड्याच्या बऱ्याच भागात व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे.

कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

Leave a Comment