मोठी बातमी : लालू लालूप्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी झालं…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-चारा घोटाळाप्रकरणी कैदेची शिक्षा भोगत असलेले राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

फुफ्फुसातील संक्रमणाने ग्रस्त ७२ वर्षीय लालू सध्या रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार घेत होते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची तब्येत आणखी बिघडली आहे.

त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लालू यांच्या फुफ्फुसात पाणी झालं असून, चेहऱ्यावर सूज आली आहे. त्यांची एक किडनीही खराब झाली आहे.

मात्र, गत दोन दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास सुरू झाल्यामुळे केलेल्या तपासणीत लालूंना न्यूमोनिया असल्याचे शुक्रवारी निष्पन्न झाले.

त्यामुळे लालूंना दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचा निर्णय रांची येथील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान अर्थात रिम्सचे संचालक डॉ. कामेश्वर प्रसाद यांनी घेतला आहे. एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था होताच लालूंना एम्समध्ये पाठविले जाणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले.

तत्पूर्वी लालूंचा धाकटा मुलगा व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शुक्रवारी एक ट्विट करत लालूजींना श्वास घ्यायला त्रास होत असून त्यांचे मूत्रपिंड २५ टक्के काम करत असल्याचे सांगितले होते. या ट्विटनंतर लालूंची पत्नी राबडी देवी, मुलगी मिसा भारती व तेजप्रताप, तेजस्वी ही दोन मुले एका विशेष विमानाने शुक्रवारी रांचीमध्ये दाखल झाले होते.

Leave a Comment