जागेचे आमिष दाखवत नऊ लाखांना गंडा घातला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नगर शहरातील झोपडी कँटीन जवळील परिसरात असलेले सेंट मोनिका डी. एड. कॉलेजच्या जागेवर प्लॉट देतो असे सांगत एकाची 9 लाखाची फसवणूक करण्यात आली असल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, या फसवणूक प्रकरणी बाळू भास्कर पंडीत (वय ४७ प्रेमदान हाडको, नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीनुसार दिलीप प्रभाकर काकडे (रा. तारकपूर, नगर) व भास्कर जेकब साळवे (रा. जेलरोड, नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घडलेली घटना अशी कि, आरोपी यांनी फिर्यादीला नाशिक येथील डायोसेशन कौन्सिलचे चेअरमन व विश्‍वस्त असल्याचे खोटे भासविले.

दोन खोट्या नोटर्‍या करून सेंट मोनिका डी. एड. कॉलेजच्या जागेवर प्लॉट देतो असे सांगितले व आरोपी यांनी फिर्यादीकडून 10 लाख रूपये रोख घेतले. त्यातील एक लाख रूपये 21 डिसेंबर 2017 रोजी परत दिले.

तर 9 लाख रूपयांची मागणी फिर्यादी यांनी आरोपीकडे केली असता आरोपी यांनी शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे करीत आहे.

Leave a Comment