आम्ही ही याच देशातील आहोत, आमची ही जनगणना करा, पंकजा मुंडेंची मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-ओबीसी समाज आरक्षणाच्या मुद्यावरुन आक्रमक झाला असुन आता भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी रविवारी एक ट्विट करुन ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली.

पंकजा मुंडे यांचे फडणवीस गटाशी वारंवार वाद झालाय त्याच आता ओबीसी समाज आरक्षणाच्य़ा मू़द्यावरुन सरकारला घेरण्याचं प्रयत्न करताना दिसतयं पंकजा सुरुवातीला फडणवीस गटाशी असलेल्या वादामुळे पक्षात सारल्या गेल्या होत्या.

त्यानंतर भाजपाकडुन पंकजा मुंडे यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. त्यामुऴे पंकजा राष्ट्रीय स्तरावरील कामांमध्ये व्यस्त झाल्या होत्या.

मात्र, आता आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असतांना पंकजा मुंडे यांनी ट्वीट करुन पुन्हा स्थानिक राजकारणात परतलया आहेत. देशाची १६ वी जनगणना २०२१ मध्ये होणार आहे.

विशेष बाब म्हणजे ही जनगणना मोबाइल अ‍ॅपवरून होणार आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना डिजिटल पद्धतीने होणार असल्याची याआधी माहिती दिली आहे. जनगणनेला एप्रिल किंवा मे महिन्यात सुरुवात होणार आहे.

त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पंकजा यांनी

गोपीनाथ मुंडेंचा २०११ मधील संसदेतील भाषणाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, गोपीनाथ मुंडेंनी केंद्र सरकारकडे ओबीसी जनगणना स्वतंत्र करण्याची मागणी केली होती.

Leave a Comment