हे नामांतर नाही तर शुद्धीकरण आहे!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- औरंगाबाद या शहराचे नाव संभाजीनगर करणे गरजेचे आहे. हे नामांतर नाही तर शुद्धीकरण आहे.

भारतीय संस्कृतीचा लवलेश नसलेल्या, भारतीय इतिहासासोबत सहानभुती नसणाऱ्या आक्रमकांची नावे शहराला असणे हा भारताचा कलंक आहे, त्यामुळे नामांतर करून हा कलंक पुसून टाकण्याची गरज असल्याचे हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय देसाई म्हणाले.

औरंगाबादहून पुण्याला जाताना त्यांनी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. देसाई म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या वडिलांचे नाव चुकले, तर ते सुधारणे जेवढे मुलाचे दायित्व आहे, तेवढेच महाराष्ट्राला भूषवणारे संभाजीनगर हे नाव आहे.

त्यामुळे औरंगाबादचे संभाजीनगर असे शुद्धीकरण गरजेचे आहे. ते नामांतर नसेल तर शुद्धीकरण असेल. ब्रिटिश भारतातून पळून गेले.

आपण ब्रिटिशांना नाकारले, त्याचप्रमाणे परकीयांची नावे या देशातून काढून भारतीय संस्कृतीसोबत एकनिष्ठ असणारी नावे असावीत, अशी आमची भूमिका आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये ही प्रक्रिया सुरू केली आहे, तीच महाराष्ट्रात सुरू करावी, यासाठी आम्ही आंदोलनाची पार्श्‍वभूमी तयार करत आहोत.

Leave a Comment