मुकेश अंबानी जगातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती, टॉप 100 मध्ये तीन भारतीय ; पहा लिस्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- गेल्या वर्षी 2020 मध्ये कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग अस्त-व्यस्त झाले होते, मात्र तरीही श्रीमंतांच्या संपत्तीत विक्रमी वाढ झाली होती. हुरुनने ग्लोबल रिच लिस्ट 2021 जाहीर केली आहे.

हुरुनच्या यादीमध्ये जगभरामधील 3228 अब्जाधीशांना स्थान देण्यात आले असून रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे अव्वल स्थानी आहेत. मुकेश अंबानी हे 8300 करोड़ डॉलर्स (6.05लाख कोटी रुपये) संपत्तीसह आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत.

मुकेश अंबानी यांना जगभरातील श्रीमंतांच्या यादीत आठव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. Hurun अहवालानुसार टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. या यादीमध्ये प्रथमच मस्क यांना प्रथम स्थान प्राप्त झाले आहे.

त्यांची संपत्ती 19.7 हजार कोटी डॉलर्स (14.41 लाख कोटी रुपये) इतकी आहे. पहिल्यांदाच भारताच्या शेजारील देश बांगलादेशातील तीन अब्जाधीशांना या यादीमध्ये स्थान देण्यात आले आहे.

 हे आहेत देशातील टॉप -5 श्रीमंत

  • – हुरुनच्या यादीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे मुकेश अंबानी. अंबानी यांची संपत्ती 8300 करोड़ (6.05 लाख कोटी रुपये) इतकी आहे.
  • – अंबानीनंतर गौतम अदानी आणि कुटुंबीयांचे नाव आहे. त्यांची संपत्ती 3200 कोटी (2.34 लाख करोड़ रुपये) आहे. जगभरातील श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी आणि कुटुंबीय 48 व्या क्रमांकावर आहेत.
  • – जगातील टॉप 100 श्रीमंत लोकांच्या यादीत 2700 दशलक्ष डॉलर्स (1.94 लाख कोटी रुपये) संपत्तीसह भारतातील शिव नादर अँड फॅमिली देखील 58 व्या स्थानावर आहे.
  • – आर्सेलर मित्तलच्या लक्ष्मी एन मित्तल यांकडे 1900 करोड़ डॉलर (1.4 लाख करोड़ रुपये) ची संपत्ती असून ते जगभरातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 104 व्या क्रमांकावर आहेत.
  • – कोरोना लस तयार करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेरेस पूनावाला देशातील पाचवे श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते 113 व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 1850 करोड़ डॉलर (1.35 लाख करोड़ रुपये) आहे.
  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर