तिच्या एका साक्षीने चौघांची रवानगी तुरुंगात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:-प्रवाश्यांच्या पळवापळवीचा राग आल्याने रिक्षा चालकाने एसटीच्या महिला वाहकाला दमबाजी केल्याप्रकरणी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान हि घटना 2014 साली शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाट्यावर घडली होती. नेमके प्रकरण काय आहे? जाणून घ्या एसटीच्या वाहक प्रमिला पालवे यांनी यासंबंधी फिर्याद दिली होती.

न्यायालयातही त्यांनी धाडसाने साक्ष दिली. १८ जून २०१४ रोजी त्या शेवगावच्या एसटी बसवर वाहक म्हणून काम करीत होत्या. भातकुडगाव फाट्यावरून दहीगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील थांब्यावर त्यांनी बस थांबविली.

तेव्हा तेथे आधीच उभ्या असलेल्या रिक्षात काही प्रवासी बसलेले होते. एसटी बस थांबल्याचे पाहून ते रिक्षातून उतरले आणि बसमध्ये जाऊन बसले. याचा रिक्षाचालकाला राग आला.

त्याने व साथीदारांनी बसच्या वाहक पालवे यांना शिवीगाळ केली तसेच धमकीही दिली. पालवे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची न्यायालयात सुनावणी झाली.

याप्रकरणी अरविंद योसेफ कांबळे (वय २२), बापू चंद्रभान चव्हाण (वय २७ रा. शहर टाकळी, ता.शेवगाव) व समीर बबन सय्यद (वय २७, रा. आंत्रे, ता.शेवगाव) यांना शिक्षा सुनावण्यात आली.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी १ महिना साधी कैद व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साथी कैद, धमकी दिल्याबद्दल १ महिना साधी कैद व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा देण्यात आली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|