विनामास्क फिरणाऱ्या दहा हजाराहून अधिकांवर कारवाईची संक्रांत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  जिल्ह्यात कोरोना पुन्हा फोफावू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला आहे.

प्रशासनाने २० फेब्रुवारी ते ०३ मार्च या कालावधीत मास्क न वापरणार्‍या १० हजार १५० जणांवर दंडात्मक कार्यवाही करुन तब्बल 11 लाख ३६ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोना असतानाही जिल्ह्यात अनेक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

यामुळे प्रशासनाकडून याठिकाणावर देखील कारवाई केली जात आहे. नुकतेच लग्न समारंभ, हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे अशा 191 ठिकाणांवर दंडात्मक कारवाई करुन 2 लाख 4 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येत आहे. मागील महिन्यापासून जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या.

रात्री अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी केली. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर आणि सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुणे आदींबाबत त्यांनी नागरिकांना आवाहन केले. याशिवाय, गर्दी टाळण्याचेही आवाहन केले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर