12 हजाराच्या नादात महिलेने दीड तोळ्याचे दागिने गमावले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सरकारी योजनेचा बहाणा करून एका भामट्याने एका वृद्धेचे दीड तोळ्याचे दागिने लंपास केले असल्याची घटना राहुरी नगरपरिषदेच्या परिसरात घडली आहे.

याप्रकरणी कमरूनिसा शेख यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कमरूनिसा युसूफ शेख (वय 70 वर्षे, रा. राहुरी फॅक्टरी) ही वयोवृद्ध महिला राहुरी शहरातील आपल्या नातेवाईकाकडे आल्या होत्या.

यावेळी बसस्थानकात उतरून नगरपरिषद इमारत जवळून खाटीकगल्ली येथे पायी जात होत्या. यावेळी एक अज्ञात भामटा त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, मी नगरपालिकेचा सरकारी कर्मचारी आहे.

सरकारी योजनेमध्ये गरीब लोकांना 12 हजार रुपये देत आहेत. मी तुम्हाला ते 12 हजार रुपये सरकारमार्फत घेऊन देतो, असे सांगून विश्वासात घेतले.

नंतर त्या भामट्याने कमरूनिसा शेख या महिलेला राहुरी नगरपालिकेच्या पार्किंग मध्ये नेले आणि योजनेसाठी तुमचा एक फोटो लागेल.

असे सांगून त्यांच्या अंगावरील दागिने काढून ठेवण्यास सांगितले. वृद्धेने सर्व दागिने एका पर्समध्ये ठेवली व पर्स शेजारील एका महिलेच्या हातात दिली.

त्यानंतर भामट्याने वृद्धेला नगर परिषदेत जाऊन येतो असे सांगून बाहेर थांबविले व दुसऱ्या महिलेजवळ ठेवलेले दागिने घेऊन फरार झाला.

बराच वेळ झाला तरी तो भामटा न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्या वयोवृद्ध महिलेने आपल्या नातेवाईकांसह राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद नोंदविली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर