नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचा कारखाना केला उद्ध्वस्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- नक्षलग्रस्त भाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोलीमध्ये एक अत्यंत महत्वाची घटना घडली असल्याचे समजते आहे.

गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचं शस्त्र निर्मितीचं युनिट (कारखाना) उद्ध्वस्त केलं आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेजवळील गडचिरोली पोलिसांच्या सी-60 कमांडोच्या नेतृत्वात सुरू असलेल्या अभियानात नक्षलवाद्यांच्या शस्त्रांस तयार करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला.

दरम्यान या प्रकरणी गडचिरोली रेंजचे पोलीस उपमहानिर्देशक संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले कि, छत्तीसगड सीमेजवळील तब्बल 5 किलोमीटर आत माड भागात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या संघर्षात एक जवान जखमी झाला आहे.

तसेच पोलीस दलाच्या मदतीसाठी एक हेलिकॉप्टर रवाना करण्यात आलं आहे. येथील माओवाद्यांच्या शस्त्रास्त्र तयार करणाऱ्या युनिटचा भांडाफोड झाला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर