विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांना देखील कोरोनाची बाधा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:-  जिल्ह्यात कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

काही दिवसांपूर्वीच एका शाळेतील विद्यार्थी कोरोनाच्या जाळ्यात सापडले असल्याची बातमी ताजी असतानाच श्रीरामपूर तालुक्यातील एका शाळेतील दोन शिक्षक कोरोनाबाधित आढळून आले आहे.

श्रीरामपूर तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सात पर्यंत कोरोना चाचणीत 13 रुग्ण करोना बाधीत आढळले आहेत. तर तालुक्यातील शैक्षणिक संकुलात आता करोनाने शिरकाव करायला सुरुवात केली आहे.

मागील आठवड्यात मालुंजा येथील विद्यालयात करोना बाधीत विद्यार्थीनी सापडली होती. त्यावर स्थानिक शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांनी सात दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर शुक्रवारी बेलापुरातील दोन शिक्षक बाधीत निघाले आहेत. या संकुलात बेलापूरसह विविध ठिकाणहून मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.

अजून कोणाला बाधा होऊ नये म्हणून व करोनाची साखळी तुटावी यासाठी संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सात दिवस (शुक्रवारपर्यंत) दिवस संपूर्ण शैक्षणिक संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर