उन्हाचा कडाका वाढताच भाजीपाला महागला वाचा अहमदनगर जिल्ह्यातील बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- आठवड्याभरापासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. उन वाढताच भाजीपाल्याचे दर देखील काहीअंशी वधारले आहेत.

भाजीपाला वधारल्याने पालेभाज्या उत्पादकांना दोन पैसे मिळत आहेत. सध्या एकीकडे भाजीपाल्याचे दर वाढत असताना दुसरीकडे मात्र कांद्याचे दर सपाटून पडत आहेत.

मागील महिन्यात ३० ते ३५ रूपये किलो या दराने विकला जाणारा कांदा आत अवघा १५ ते १७ रुपयांवर येवून ठेपलेला आहे. त्यामुळे कांदाउत्पादक शेतकरी मात्र चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

यावर्षी उतिवृष्टीमुळे आधीच कांद्याचे प्रचंड नुकसान झाले. नंतर कांद्याच्या बियाणांचे प्रचंड दर वाढले त्यात देखील अनेक बियांणे उगवलेच नाही.

जे उगवले ते देखील अनेक रोगांच्या प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणावर महागडी औषधांच्या फवारण्या करून कसाबसा कांदा जगवला आहे.

मात्र या सर्व संकटामुळे यंदा कांदा उत्पादनात जवळपास ३० ते ४० टक्के घट झालेली आहे. असे असताना देखील कांद्याचे दर सपाटून पडले आहेत. मात्र भाजीपाल्याला बऱ्यापैकी दर मिळत आहेत.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर: टोमॅटो २०० – ८००,वांगी ८०० – १०००,फ्लॉवर ८०० – १५००,कोबी ४०० – ५००,काकडी १००० – २०००,गवार ४००० – ८५००, घोसाळे २००० – ३०००,

दोडका २००० – ३०००,कारले २५०० – ३५००,वाल १५०० – २५००, घेवडा १५०० – २२००,बटाटे ५०० – ११००,लसूण २००० – ६०००, हिरवी मिरची २५०० – ४०००, लिंबू ३००० – ५०००,मेथी ३०० – ५००,कोथींबीर ४०० – ६००.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर