पुण्यात ‘रेमडेसिवीर’ साठी प्राण कंठाशी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-आपल्या घरातील व्यक्ती, नातेवाईक, मित्राची आरोग्य स्थिती गंभीर असताना अशा रुग्णांसाठी डॉक्टरांच्या मागणीनुसार ‘रेमडेसिवीर’साठी जवळच्या नातेवाइकांची मोठी धावपळ होत आहे. या इंजेक्शनसाठी प्राण कंठाशी येत आहेत.

गेल्या एक-दोन दिवसात तर पुण्यात शहरात ‘रेमडेसिविर’चा तुटवडा निर्माण झाला आहे. ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनमध्ये होणाऱ्या काळाबाजाराची दखल राज्य शासनाला घ्यावी लागली आहे.

या इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्याकरिता स्वतंत्र समितीही स्थापन करण्याच्या सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केल्या आहेत.

शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये अनेक जणांना आधार कार्ड, डॉक्टरांचे मूळ प्रिस्क्रिप्शन, रुग्ण पॉझिटिव्ह रिपोर्टची झेरॉक्स नसल्यामुळे औषधे दिली गेली नाहीत.

झेरॉक्स काढण्यासाठी दुकाने शोधण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक रडकुंडीला आल्याचे चित्र होते अनेक तास रांगेत थांबून फक्त झेरॉक्स नाही म्हणून इंजेक्शन मिळाले नसल्याचे अनेकांनी सांगितले.

पुण्यात शुक्रवार पेठेतील केमिस्ट असोसिएशनच्या ऑफिसमध्ये करोना रुग्णांना उपयुक्‍त ठरणारे ‘रेमडेसिवीर’ इंजेक्‍शन मिळेल म्हणून वर्तमानपत्र आणि सोशल मीडियावरील माहितीवरून शेकडो रुग्णांचे नातेवाईक येथे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

मात्र, साठा कमी असल्याने विना अन्नपाणी तासन्‌तास रांगेत ताटकळत उभा राहणाऱ्यसा नातेवाइकांच्या पदरी निराशाच पडत आहे.

राज्य शासनाने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार रुग्णाची ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी आणि सिटी स्कोर ९ पेक्षा जास्त असेल तरच रेमडेसिवीर इंजेक्शन वापरावे. हायपोरझिया, फिवर आणि सिटी स्कोर याचे प्रमाण पाहूनच गरज असेल

तरच या इंजेक्शनचा वापर करणे योग्य ठरते, असे कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉ. कन्हैया ताथेड यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|