सिरम इन्स्टिट्यूट कडून प्रतिमहिना दहा कोटी लसींची निर्मिती केली जाऊ शकते

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- देशात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पण लसीचा पुरेसा साठा नसल्यामुळे बर्‍याच राज्यात, 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी लसीकरण अजून सुरु झालेलं नाही.

दरम्यान जगभरातली सगळ्यात मोठी लस बनवणारी कंपनी म्हणून ओळख असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावाला यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

आदर पुनावाला म्हणाले कि, सीरम इन्स्टिट्यूटची घौडदौड अत्यंत वेगाने सुरू असून सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज मितीला इन्स्टिट्यूटमध्ये तब्बल एक कोटी लशींचा साठा करण्यात आला आहे. प्रति महिना पाच ते सहा कोटी लशींचं उत्पादन करायला सीरम इन्स्टिट्यूटला यश मिळत आहे.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट मांजरी स्थित नव्याने सुरू झालेल्या प्लांटमध्ये लशीच्या उत्पादनाची तयारी सुरू असून नियोजनाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडल्या तर जून महिन्याच्या अखेरीस सिरम इन्स्टिट्यूट कडून प्रतिमहिना दहा कोटी लसींची निर्मिती केली जाऊ शकते.

तसेच ते पुढे म्हणाले की, ‘लसीचे उत्पादन एका रात्रीत वाढवले जाऊ शकत नाही. आम्हाला हे देखील समजून घेण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि सर्व प्रौढांसाठी लसीच्या डोसचे उत्पादन हे एक सोपे काम नाही.

अगदी विकसित देश आणि कमी लोकसंख्या असलेल्या कंपन्याही यावर संघर्ष करताना दिसतात. आम्हाला आतापर्यंत 26 कोटी डोसची ऑर्डर मिळाली असून त्यापैकी 15 कोटीहून अधिक डोस पुरवण्यात आले आहेत.

भारत सरकारकडून पुढील काही महिन्यात 11 कोटी डोससाठी 1,732.50 कोटी रुपयांची 100 टक्के आगाऊ रक्कमही मिळाली आहे. दुसऱ्या टप्प्यात 11 कोटी डोस राज्य आणि खासगी रुग्णांलयात पुरवण्यात येतील, अशी माहिती पूनावाला यांनी दिलीये.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|