आमदार निलेश लंके यांचे अभिमानास्पद काम ! आता इथेही घेतलीय आघाडी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे श्री नागेश्वर मंगल कार्यालयात १ हजार १०० बेडचे शरदचंद्र आरोग्य मंदीर सुरू करून देशभरात प्रकाशझोतात आलेल्या आमदार निलेश लंके यांनी प्लाझ्मा संकलनातही आघाडी घेतली आहे.

कोव्हीड सेंटरमध्ये प्लाझ्मा संकलन कॅम्पचे आयोजन करण्यात येऊन त्यात ५० जणांनी प्लाझ्मा दान केले.शनिवारी सकाळी आ. लंके यांच्या हस्ते डोनेशन कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरोनावर मात केलेल्या

रूग्णांनी विशिष्ठ वेळेनंतर प्लाझ्मा दान करून कोरोना बाधितांना जिवदान देण्याचे पुण्य केले पाहिजे. कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेऊन बाहेर पडणाऱ्या रूग्णांनीही प्लाझ्मा दानात योगदान दिले पाहिजे. कोव्हीड सेंटरमध्ये सध्या प्रशासनाचे डॉक्टर उपचार करीत आहेत.

आता डॉक्टरांच्या सल्ल्याने आयुर्वेद शास्त्राचा वापर करून रूग्णांवर औषधोपचार करण्यात येणार आहेत. या केंद्रामध्ये उपचार घेत असलेले रूग्ण सुरक्षित घरी गेले पाहिजेत या भुमिकेतून आम्ही काम करीत आहोत.आ. लंके पुढे म्हणाले, या केंद्रातून आतापर्यंत २ हजार २०० रूग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत.

१२८ रूग्णांना नगर येथे उपचारासाठी पाठवून त्यांच्यावरही यशस्वी उपचार झाले. हे कोव्हीड सेंटर नसून अखंड हरीनाम सप्ताह असल्याचे सांगत तुमच्या मनातील कोरोनाची भिती दुर झाली पाहिजे. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने रूग्णांमध्ये भिती निर्माण होते.

कोणीही मनामध्ये भिती बाळगू नका, काही होणार नाही मी तुमच्या पाठीशी उभा आहे अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटेे, अ­ॅड. राहुल झावरे, उद्योजक सुरेश धुरपते, राजेंद्र चौधरी, बापूसाहेब शिर्के, अभयसिंह नांगरे, संदीप चौधरी, पै. प्रमोेद गोडसे,

संदीप रोहोकले, सुरज भुजबळ, बाळासाहेब खिलारी, दत्ता कोरडे, डॉ. बाळासाहेब कावरे, मुकूंदा शिंदे, अर्जुन कुलकर्णी, संदीप भागवत, तहसिलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने,

डॉ. अनविता भांगे, डॉ. मानसी मानोरकर, डॉ. रजनी नवले, डॉ. प्रिया देशमुख, डॉ. अपूर्वा वाघमारे, डॉ. ॠतूजा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|