‘या’ बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक दर!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- येथील नेप्ती कृषी उत्पन्न उपबाजार समितीत काल झालेल्या लिलावात तब्बल ४५ हजार ३१९ कांदा गोण्यांची आवक झाली.

मात्र त्या तुलनेत कांद्याला दर मिळाला नाही. येथे एक नंबर कांद्याला अवघा १५०० ते २००० रुपये एवढा दर मिळाला. तर २ व ३ नंबरच्या कांद्याला अवघा १५०० ते १०५० असे दर मिळाला.

मात्र नगरच्या तुलनेत राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत ११ हजार १९१ कांदा गोण्यांची आवक झाली. त्यात एक नंबर कांद्याला १६०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर दोन नंबर कांद्यास १०५० ते १५५०,

तीन नंबर कांद्यास ५०० ते १०००, गोल्टी कांद्यास १२०० ते १५००, जोड कांदा १०० ते ५०० असा भाव निघाला. त्याचप्रमाणे येथे १४ हजार ६४२ क्रेट्स डाळिंबाची मोठी आवक झाली.

त्यात एक नंबर डाळिंबाला ८६ ते ११० रुपये, दोन नंबर डाळिंबास ६१ ते ८५, तीन नंबर ३१ ते ६०, चार नंबर २.५० ते ३० रुपये प्रतिकिलो भाव निघाला आहे.

कांद्याच्या तुलनेत नगर येथील बाजार समितीत डाळिंबाला चांगला भाव मिळाला. काल डाळिंब २००० ते १० हजार रुपये प्रति क्विंटल असा दर भेटला.