नागरिकांनो लक्ष द्या… नाहीतर क्षणात तुमच्या खात्याती पैसे होतील गायब

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 जुलै 2021 :-   देशभरात सध्या सायबर गुन्हेगारी प्रथम क्रमांकावर असून यामध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रमाण अधिक आहे. सायबर भामट्यांनी लाटलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फारच कमी असते.

यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे बनू लागले आहे, नाहीतर काही क्षणात तुमच्या खात्यातील रक्कम हॅकर लंपास करू शकतो. नेमके कशी होती हि फसवणूक जाणून घ्या सायबर गुन्हेगारांनी पाठविलेल्या लिंकवरील ॲप डाऊनलोड केल्यास मोबाईल, लॅपटॉप अथवा संगणकाची लिंक थेट शेअर होते.

त्यामुळे आपण मोबाईलवर जी काही प्रक्रिया करतो ते सर्व गुन्हेगारांना दिसते. बहुतांशी जण बँकांचे व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून करतात. त्यामुळे गुन्हेगारांना मोबाईलमधील पासवर्ड सहज मिळतात.

आणि यातून आपली फसवणूक होऊ शकते. हि खबरदारी घ्यावी आपल्या मोबाईलवर आलेल्या एसएमएस अथवा कुणी फोन करून कुठलेही ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले तर ते करू नये. कामानिमित्त ॲप डाऊनलोड करत असाल तर त्याच्या संदर्भातील येणाऱ्या सूचना आधी वाचाव्यात.

आपली वैयक्तिक माहिती कुणालाही सांगू नये. यामुळे आपली फसवणूक होण्यापासून वाचू शकता. तक्रार करण्यापूर्वी हे काम करा फसवणूक झाल्यापासून वळते केलेले पैसे काढण्यापर्यंतचा कालावधी महत्त्वाचा असतो.

अपघाताप्रमाणे सायबर गुन्ह्यामध्ये हा गोल्डन अवर मानला जातो. वळवण्यात आलेले पैसे काढले नसतील तर ज्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आली ती गोठविण्यात येतात.

तक्रार करणे, गुन्हा दाखल करणे या प्रक्रियेत वेळ घालविण्यापूर्वी बँक खात्याचा तपशील पोलिसांना द्यायला हवा. यामुळे आपली आर्थिक हानी होण्याचापासून वाचू शकतो.