महसूल विभागाच्या कारभाराला ब्रेक…तहसीलदारांचे ‘काम बंद’ आंदोलन सुरू!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी सोमवार दि.३ एप्रिल पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाााजवळ या जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार अधिकाऱ्यांनी घोषणा देत आपल्या मागणीकडे लक्ष वेधून घेतले. तसेच निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांची भेट घेऊन पुनश्च एकवार आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.महसूल विभागाच्या कारभाराला या आंदोलनामुळे ब्रेक लागला नसेल तरंच नवल!

यावेळी सहाय्यक नगर तहसीलचे तहसीलदार सुरेश शिंदे, राहुरी तहसीलदार एफ.आर.शेख, जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम, महसूल शाखेच्या चिटणीस तथा तहसीलदार माधुरी आंधळे, सामान्य प्रशासन शाखेच्या तहसीलदार वैशाली आव्हाड, निवडणूक शाखेचे तहसीलदार चंद्रशेखर शितोळे, अहमदनगर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी तथा तहसीलदार अर्चना पागिरे, पुनर्वसनचे तहसीलदार रोहिदास वारुळे, पाथर्डी तहसीलदार श्याम वाडकर, भूसुधार तहसीलदार सुनीता जऱ्हाड, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार शंकर रोडे, प्रशांत गोसावी, रोजगार हमी शाखेचे नायब तहसीलदार योगेश कुलकर्णी,

नगर तहसीलचे निवासी नायब तहसीलदार अभिजीत बारवकर, नगर तहसील नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, गृह शाखेचे नायब तहसीलदार राजू दिवाण, नगर शहर एफडीओ नायब तहसीलदार कैलास साळुंके, मदत व पुनर्वसन नायब तहसीलदार वरदा सोमण, सामान्य प्रशासन शाखा नायब तहसीलदार छाया चौधरी, नेवासा नायब तहसीलदार किशोर सानप, पाथर्डी नायब तहसीलदार अनिल तोरडमल, नगर तहसील नायब तहसीलदार विक्रम पवार, अकोले नायब तहसीलदार सुधीर उबाळे, कर्जत नायब तहसीलदार प्रकाश बरुंगळे. मख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे नायब यासंह अनेकजण उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार ब नायब तहसीलदार यांचा ग्रेड पे वाढवण्याबाबत संघटनेने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, या संदर्भात शासन स्तरावरून अद्याप पावेतो कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही. बक्षी आयोगासमोर वेतन त्रुटी संदर्भात सादरीकरण करण्यात आले. तरी देखील संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार झालेला नाही. त्यामुळे संघटनेच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार दि.३ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत आहोत. दरम्यान पहिल्या दिवशी जिल्ह्यातील ३ उपजिल्हाधिकारी, २१ तहसीलदारांपैकी १८ (३ रजेवर), ६० नायब तहसीलदारांपैकी ५८ (२ रजेवर) असे ७९ अधिकारी या संपात सहभागी झाले होते.