Ahmednagar City News : सुर्यनगर येथील रस्त्याचा प्रश्न खा. विखे यांच्यामुळे मार्गी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar City News : अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नाने व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने नगर – छत्रपती संभाजीनगर रोडवरील सूर्यनगर परिसरातील

अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे येथील नागरिकांचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.

या कार्यक्रमास आ. संग्राम जगताप, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेविका रुपाली वारे, पल्लवी जाधव, सभागृहनेते विनित पाउलबुधे, नगरसेवक सुनिल त्र्यंबके, अविनाश घुले, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, आदिंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्तविकात वारे म्हणाले, लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले, त्यांचा विश्वास विकास कामे करुन सार्थ करण्याचा प्रयत्न आम्ही करतो. प्रभाग मोठा असला तरी स्थानिक निधी, आमदार निधीबरोबरच खा. डॉ. सुजय विखे यांच्याकडे सूर्यनगरच्या रस्त्यासाठी पाठपुरावा केल्याने प्रयत्नांना यश मिळाले असल्याचे ते म्हणाले.

खा. विखे म्हणाले की, नगर शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून आ.संग्राम जगताप, खासदार म्हणून मी केंद्र शासनाकडून मोठा निधी उपलब्ध करतो. प्रभाग दोनचे चारही नगरसेवक कार्यतत्पर आहेत.

निखिल वारे तर एखादा प्रश्न सोडविण्यासाठी माझ्याकडे आले तर तो पूर्ण सुटेपर्यंत पाठपुरावा करतात. नागरिकांच्या प्रश्नांसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.