अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनानंतरचं पहिलं होईक आलं, वर्तविला हा अंदाज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2022 AhmednagarLive24:- जिल्ह्यात गावोगावच्या यात्रांच्यानिमित्ताने होईक म्हणजे भविष्यातील अंदाज वर्तविण्याची प्रथा आहे. यावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.

संबंधित गावकऱ्यांनी या प्रथा वर्षानुवर्षे या प्रथा जपल्या असून ते ऐकण्यासाठी तेवढी उत्सुकता असते. कोरोना काळात मागील दोन वर्षे यामध्ये अडचणी आल्या होत्या.

आता पुन्हा यात्रा आणि होईक सुरू होतील. कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या बाल भैरवनाथ व माता जोगेश्वरी याचं कोरोनानंतरच पहिलं होईक जाहीर झालं आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी हे होईक जाहीर केलं जातं. यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल, अन्नधान्य मुबलक पिकेल, लग्न विधी मोठ्या प्रमाणात पार पडतील असा असा अंदाज यातून वर्तविण्यात आला आहे.

हे होईक वर्तवविण्याची गावाची एक पद्धत आहे. त्यानुसार ते वर्तविण्या आलं आहे. पुरोहित विनोद जोशी यांनी हे होईक सांगितलं. दोन वर्षांनंतर यावर्षी यात्रा भरणार असल्याचं केशवराव होन यांनी जाहीर केलं.