अहमदनगर ब्रेकींग: 112 च्या कॉलमुळे पकडला सव्वा तीन लाखांचा गुटखा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, , 01 फेब्रुवारी 2022 :- तोफखाना पोलिसांनी सिव्हील हाडको परिसरात छापा टाकून तीन लाख 22 हजार रूपये किंमतीचा गुटखा पकडला. या गुटख्याच्या साठ्याबाबतची माहिती 112 क्रमांकावर तोफखाना पोलिसांना मिळाली होती.

सोमवारी रात्री सिव्हील हाडको परिसरात ही कारवाई केली. याप्रकरणी संतोष गोकुळ साळवे (वय 47 रा. जे. जे. गल्ली, मंगलगेट, नगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई दीपक आव्हाड यांनी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार गिर्‍हे व केदार हे एमडीटी 112 चा टॅब घेऊन कर्तव्यावर असताना

त्यांना फोन आला की, सिव्हील हाडको कॉलनीत म्हाडा बिल्डींग शेजारी नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आहुजा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला आहे.

अशी माहिती मिळताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी, अंमलदार यांनी पथकासह फोनवर मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जावून खात्री केली असता

सदर ठिकाणी आरएमटी, तंबाखू, विमल असा तीन लाख 22 हजार रूपये किंमतीचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी सदरचा गुटखा जप्त केला असून संतोष साळवे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहे.