अहमदनगर ब्रेकिंग : घराबाहेर पडण्याआधी हे नियम वाचाच ! उद्यापासून सहा दिवस अहमदनगर शहर व जिल्ह्यात…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2022 Ahmednagarlive24 :- होळी, धुलीवंदन, शिवजयंती व रंगपंचमी या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच कोरोना विषाणूच्या ओमॉयक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढू नये

यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १ ) ( ३ ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार १७ ते २२ मार्च या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

अहमदनगर शहर व जिल्ह्यात १७ मार्च रोजी ‘होळी’, १८ मार्च रोजी ‘धुलीवंदन’, २१ मार्च रोजी तिथीप्रमाणे ‘शिवजयंती’ व २२ मार्च रोजी रंगपंचमी हे सण / उत्सव साजरे केले जाणार आहेत.

सध्या कोरोना विषाणूच्या ओमॉयक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव देखील राज्यात चालू आहे. सदर उत्सवाच्या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच जिल्हयामध्ये विविध राजकीय पक्ष कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको होतात. त्याचप्रमाणे सध्या जिल्हयात यात्रा उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे होतात त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वरील पार्श्वभूमीवर जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलीसांना मदत व्हावी

म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात १७ मार्च ते २२ मार्च २०२२ या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी जारी करण्यात आले आहेत.

प्रतिबंधात्मक आदेश असताना शस्त्रे, काठया, सोटे तलवारी भाले, सुरे, बंदुका, दंडे अगर लाठया किंवा शारिरीक इजा करणेसाठी
वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.,

दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे व साधने जवळ बाळगणे किंवा तयार करणे किंवा जमा करणे., कोणत्याही व्यक्तींच्या आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमेचे प्रदर्शन करणे., को

णताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक जवळ बाळगणे किंवा तयार करणे, जाहीरपणे घोषणा देणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे ध्वनिवर्धक किंवा ध्वनीक्षेपक यासारखे मानवी आवाजाचे वर्धन करणारा किंवा तो जसाच्या तसा ऐकवणारा उपकरण संच वापरणे किंवा वाजवणे,

सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहचेल किंवा शांतता धोक्यात येईल असे कोणतेही कृत्य करणे, आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे किंवा सोंग आणणे अगर तशी चित्रे, चिन्हे किंवा इतर वस्तू तयार करणे किंवा त्यांचा प्रचार करणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश आदेश खालील व्यक्तींना लागू होणार नाहीत. त्यामध्ये शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपले वरिष्ठांचे आदेशानुसार कर्तव्य पुर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे,

तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव लाठी अगर काठी वापरणे आवश्यक आहे, प्रेतयात्रा / अंत्यविधीस सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करण्याबाबत शासनाने / संबंधित स्थानिक प्राधिकारणाने

वेळोवेळी कोरोना विषाणूचे अनुषंगाने निर्गमित केलेल्या आदेशान्वये नमूद मर्यादित व्यक्तींची उपस्थिती, लग्नसमारंभ सामाजिक अंतराचे (Social Distancing) पालन करुन शासनाने/ संबंधित स्थानिक प्राधिकारणाने वेळोवेळी कोरोना विषाणूचे अनुषंगाने निर्गमित केलेल्या आदेशान्वये नमूद मर्यादित व्यक्तींची उपस्थिती,

नमूद कालावधीकरीता शासनाकडून / या कार्यालयाकडून / संबंधित स्थानिक प्राधिकरणाव्दारे कोरोना विषाणू प्रोटोकॉलचे अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशामध्ये सवलत दिलेल्या बाबींस व्यक्तींस हे आदेश लागू राहणार नाहीत. असेही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी प्रतिबंधात्मक आदेशात नमूद केलं आहे