अहमदनगर ब्रेकींग: तरूणावर अनैसर्गिक अत्याचार; मोबाईलमध्ये केले चित्रीकरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  रिक्षा चालक तरूणावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण देखील करण्यात आले. ते चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे खंडणी मागितली.

नगर शहरातील मुकुंदनगर परिसरात बुधवारी दुपारी एक ते गुरूवारी दुपारी पावणे पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी तिघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात अनैसर्गिक अत्याचार, अपहरण, जबरी चोरी, धमकी आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सय्यद अझर नवाजुद्दीन (वय 24), शेख अरबाज हारून (वय 22 दोघे रा. मुकुंदनगर, अहमदनगर) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित तरूणाने फिर्याद दिली आहे. सय्यद अझर नवाजुद्दीन व एक अनोळखी व्यक्तीने रिक्षा चालक तरूणाला मारहाण केली. त्याला अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडले.

या सर्व घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. ते चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत रिक्षा चालक तरूणाच्या खिशातील 850 रूपये बळजबरीने काढून घेतले.

यानंतरही त्याला वारंवार फोन करून चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे एक हजार रूपयाची खंडणी मागितली. सय्यद अझर नवाजुद्दीन व शेख अरबाज हरून यांनी औरंगाबाद रोडवरील एका पेट्रोलपंपाच्या ठिकाणी पीडित तरूणाकडून एक हजार रूपये घेतले.

पीडित तरूणाने झालेला प्रकार पोलिसांना सांगत फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जे. सी. मुजावर करीत आहेत.