Ahmednagar Corona Update : आज 50 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 38 बाधितांची रुग्ण संख्येत भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2021 :- जिल्ह्यात आज 50 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 50 हजार 812 इतकी झाली आहे.(Ahmednagar Corona Update)

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 97.91 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 38 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 356 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 13, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 18 आणि अँटीजेन चाचणीत 07 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून रुग्णामध्ये मनपा 03, अकोले 01, कर्जत 03, नेवासा 01 आणि संगमनेर 05 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 01, अकोले 02, नगर ग्रा. 04, नेवासा 01, पारनेर 01, राहुरी 02, शेवगाव 01, श्रीगोंदा 05 आणि श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 07 जण बाधित आढळुन आले. यात अकोले 03, पाथर्डी 01, राहुरी 01, संगमनेर 01 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 04, जामखेड 03, कर्जत 01, नगर ग्रा.11, नेवासा 05, पारनेर 02, पाथर्डी 03, राहाता 04, राहुरी 03,

संगमनेर 02, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 03, कॅंटोन्मेंट बोर्ड 01, इतर जिल्हा 03 आणि इतर राज्य 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:3,50,812

उपचार सुरू असलेले रूग्ण:356

पोर्टलवरील मृत्यू नोंद:7147

एकूण रूग्ण संख्या:3,58,315

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या