संतापजनक ! मयत सैनिकाची जमीन परस्पर विकून वारसांची फसवणूक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पाथर्डी शहरातील आनंदनगर येथील मयत सैनिकाच्या नावे असलेला खुला प्लॉट बनावट व्यक्ती उभी करून त्रयस्त इसमाला विक्री करून मयत सैनिक अजिनाथ शहादेव काळे यांच्या वारसांची फसवणूक केल्याप्रकरणी संबधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाथर्डी, भिंगार तसेच आष्टी येथील त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने तहसीलदार शाम वाडकर यांना निवेदन देण्यात आले.

दुय्यम निबंधक अनिल जव्हेरी यांच्या दालनात संघटनेच्या माजी सैनिकांनी ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. पाथर्डी येथील सर्व्हे नं. २५/२ पैकी प्लाट नंबर ७० विक्री क्षेत्र ७५.०० चौमी. हा खुला प्लॉट सैनिक अजिनाथ सहदेव काळे यांचे नावे होता.

अजिनाथ काळे हे मयत झाल्याचा गैरफायदा घेऊन अज्ञात आरोपींनी दि. ५ जून २०२३ रोजी अजिनाथ शहादेव काळे रा. हाकेवाडी, मोहोजदेवढे, ता. पाथर्डी यांच्याऐवजी खोटी कागदपत्रे तयार करून अज्ञात आरोपीने बनावट आधार कार्डचे ओळखपत्र तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदविण्यात आलेला आहे.

ही मिळकत उपरोक्त खरेदीखताच्या दस्तान्वये प्रदिप विष्णू गायकवाड रा. ढाकणवाडी, ता. पाथर्डी यांना विक्री केलेली आहे. सदर प्रकरणी अर्जदार अजिनाथ शहादेव काळे यांच्या पत्नी व्दारका अजिनाथ काळे रा. हाकेवाडी यांनी दुय्यम निबंधक कार्यालयाकडे आपली फसवणूक झाल्याची तकार दाखल केली आहे.

या वेळी त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन गर्जे, रोहिदास एडके, विठ्ठल तांदळे, रामराव चेमटे, म्हातारदेव आव्हाड, मधुकर चन्ने, अशोक देवढे, प्रभाकर फुंदे, सुधाकर आव्हाड, रमेश कराळे, किशोर शिरसाट, रामनाथ भाबड, चाँद पठाण, रामकिसन कुटे, महादेव आंधळे, ज्ञानेदेव जगताप, भानुदास केदार, नवनाथ आव्हाड, बद्रीनाथ मरकड तसेच आष्टी येथील सैनिक संजीव फसले, नवनाथ भगत, श्रीराम माने, बबन दहिफळे, विश्वनाथ नेटके,

कैलास पाखरे, सी. एम. खंदारे, शामराव हंगे, संजय गायकवाड, अमृत ढोबळे, भाऊसाहेब काळे, सुभाष महाजन, बाळासाहेब लोखंडे, संतोष आवटे, दादासाहेब ठोंबरे, संजय चौधरी, अशोक शिंदे, हनुमान झगडे, नारायण तळेकर, भाऊसाहेब चौधरी, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. याप्रकरणी दुय्यम निबधक अनिल जव्हेरी यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर तपास करीत आहेत.