कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सुध्दा आमच्‍या संपर्कात – ना.राधाकृष्ण विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News :- शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना मंत्री ना.विखे पाटील म्हणाले की, विरोधी पक्षातील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत  परंतू याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त दहा ते बारा लोक शिल्लक राहिले आहे. प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षात भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने  लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम  पर्याय आहे.

या पक्षाला उज्वल भवितव्य आणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व लाभले आहे.त्यामुळे विशेष आकर्षण यापूर्वी होते आणी आता यामध्ये वाढ झाली असल्याचे स्पष्ट करून कॉग्रेस आणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संपर्कात आहेत.उद्याच्या दोन पोटनिवडणुका झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

राज्यपालांच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी सुरू केलेल्या कांगाव्याला कोणताही अर्थ नाही.त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनूसारच   राजीनामा मंजूर झाला असेल. खरंतर त्यांची ज्येष्ठता, श्रेष्ठता याचा विचार करुन  त्यांचा सन्मान राखण्याचे भान विरोधकांनी ठेवले पाहिजे असे मत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी  व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की, राज्यपालांनी त्या त्या वेळी व्यासपीठावर केलेल्या वक्तव्यांबाबत  दिलगिरी व्यक्त केली आहे.हा सगळा विषय पडद्याआड झाला आहे. महाराष्ट्राच्या या राजकीय सामाजिक घडामोडीत विशेष करून किल्ले संवर्धनाचा मुद्दा याबरोबरच अनेक ऐतिहासिक बाबी राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्रासाठी केल्या आहे.एखादा अपवाद वगळता काही त्यांनी केलेल्या चांगल्या गोष्टी बाजूला करून चालणार नाहीत. राज्यपाल यांचे आता ८० वर्षाचे वय बघता त्यांचा आदर करणे अपेक्षित आहे. राजकिय पक्षात आजही अनेक जेष्ठ मंडळी आहेत. ज्यांचे वय झाले आहे त्यांच्याकडून  सुध्दा  कधी कधी आशी  वक्तव्य होवू शकतात म्हणजे मग त्यांनीही  राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे काॽ असा सवाल मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित केला. राजकिय प्रक्रियेत दुर्दैवाने असे वक्तव्य होत राहातात त्यातून सुधारणा करून आणखी चांगले काम करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आशी अपेक्षा त्यांनी  व्यक्त केली.

कॉग्रेसचे जेष्ठ नेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या नाराजी बदल विचारले असता विखे पाटील म्हणाले की, कॉग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नाराजीची फार दखल घेतलीली नाही असे मला वाटते.कॉग्रेसच्या  समित्यांचे पुनर्गठन झाले त्यामध्ये त्यांना कुठेही घेण्यात आले नाही. कुठं जायचं यासाठी त्यांना त्यांचा मार्ग मोकळा आहे पण दिल्या घरी सुखी राहा असेच मी त्यांना सांगेल.आमच्या पक्षश्रेष्ठींना जर वाटले की ते पक्षाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावू शकतात तर त्यांचे स्वागतच असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.