राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील गावांचा डोंगरी विभागात समावेश

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील ३९ गावांचा डोंगरी विकास विभागात समावेश झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

आमदार तनपुरे यांनी पत्रकात म्हटले, की राहुरी तालुक्यातील तुळापुर, जांभळी, कणगर बु, वावरथ, चिंचाळे, मल्हारवाडी, कोळेवाडी, ताहाराबाद, घोरपडवाडी, म्हैसगांव, निंधेरे, दरडगांव थडी, गाडकवाडी, गुंजाळे, वरशिंदे, चिखलठाण,

वाबळेवाडी व नगर तालुक्यातील जेऊर, खोसपुरी, धनगरवाडी, डोंगरगण, कापुरवाडी, उदरमल, मजले चिंचोली, पिंपळागांव उज्जैनी, मांजरसुंबा, ससेवाडी तसेच पाथर्डी तालुक्यातील शिरापुर, गितेवाडी, कोल्हार, करंजी, घाटशिरस, लोहसर, दगडवाडी, वैजुबाभुळगाव, डमाळवाडी या गावांचा समावेश झालेला आहे.

या समावेशामुळे या भागातील गावांचा शैक्षणिक, दळणवळण, पाणी पुरवठा, विज आदी विकास कामे होण्यास मदत होणार आहे. शासन नियमानुसार या भागातील क्षेत्रफळ किमान १०० चौ किमी असणे बंधनकारक असते.

त्यामध्ये डोंगरी भागाचे क्षेत्रफळ २० टक्क्यांपेक्षा जास्त असणे आवश्यक असते. या दोन्ही अटीही शासनाने शिथील करण्याचा निर्णय घेतल्याने या गावांचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कामी अनेक वर्षापासुन आमदार तनपुरे यांच्या प्रयत्नास यश आल्याने लाभार्थी गावातील जनतेने आमदार तनपुरे यांचे आभार मानले आहेत.